Mumbai Crime  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: धक्कादायक! ४ वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या, नातेवाईकानेच घेतला जीव; नेमकं कारण काय?

Mumbai Police: मुंबईत ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. कांदिवलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी चिमुकल्याच्या नातेवाईलाच पोलिसांनी अटक केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकानेच या चिमुकल्याची हत्या केली आणि आरोपी गुजरातला पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी २०० सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर त्याला सूरतमधून अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वाडी येथे ही घटना घडली आहे. इराणी वाडीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या ४ वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला होता. चिमुकल्याची हत्या करून आरोपी गुजरातमध्ये पळून गेला होता.

मृत मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य पाहून कांदिवली पोलिसांच्या पथकाने १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी सूरत येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी सूरत गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या. अक्षय अशोक गरूड (२५ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे.

आरोपी अक्षय गरूड हा हत्या करण्यात आलेल्या चिमुकल्या मुलाचा नातेवाईक आहे. आरोपीने असे कृत्य का केले यामागचे कारण समोर आले नाही. सध्या आरोपी कांदिवली पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीने लहान मुलाचे अपहरण करून त्याची हत्या का केली? याबाबतचा तपास कांदिवली पोलिस करत आहेत. या घटनेमुळ खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

SCROLL FOR NEXT