Tamil Nadu Crime Saam Tv
क्राईम

Crime: झाडीझुडपात ओढत नेलं; तोंडात माती कोंबली, ८० वर्षांच्या आजीवर सामूहिक बलात्कार

Tamil Nadu Crime: तामिळनाडूमध्ये ८० वर्षांच्या आजीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. ४ नराधमांनी आजीला जंगलात खेचून नेत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे तामिळनाडू हादरले आहे.

Priya More

८० वर्षांच्या आजीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तामिनाडूमध्ये घडली. आजी नेहमीप्रमाणे कामासाठी जात होत्या. त्यावेळी रस्त्याच्या कडेला दारू पिऊन बसलेल्या ४ जणांनी आजीला झाडीझुडपात ओढत नेत तिच्यासोबत भयंकर कृ्त्य केलं. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी आजीच्या कानातील आणि नाकातील सोन्याचे दागिने काढून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे तामिळनाडू हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील कड्डलोर जिल्ह्यातील पनरुतीजवळ ही धक्कादायक घटना घडली. ८० वर्षीय आजी थिरासू गावामध्ये राहते. ही आजी सकाळ आणि संध्याकाळी कामासाठी पुलवानूर रस्त्यावरून जाते. नेहमीप्रमाणे ती या रस्त्यावरून जात होती. रस्त्याच्या कडेला ४ तरुण दारू पिऊन बसले होते. त्यांची नजर आजीवर पडली.

त्यांनी तिला खेचत झाडीझुडपात नेलं. आजीने आरडाओरडा करू नये यासाठी आरोपींनी तिच्या तोंडात माती कोंबली. त्यानंतर नराधमांनी आजीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिच्या कानातील ४ ग्रॅमचे झुमके आणि २ ग्रॅमचे नाकातले हे दागिने काढून पळ काढला.

त्यानंतर आजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आजीला तात्काळ कुड्डालोर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आजीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत.

ही घटना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. असे देखील सांगितले जात आहे की पीडित आजी जंगलात शौच करण्यासाठी गेली होती. आरोपी ३५ ते ४० वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी दारू पिऊन आजीवर बलात्कार केला. फॉरेन्सिक तज्ज्ञानी पुरावे गोळा केले आहेत. सध्या या गंभीर घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे पनरुती परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra Live News Update: महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणारी व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT