mumbai crime news google
क्राईम

Mumbai Crime: धक्कदायक! आईच्या अफेअरबद्दल समजलं, १४ वर्षाच्या पोराला राग अनावर, चाकूने वार करत घेतला जीव!

Mumbai Crime: एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईचा गळा चिरुन तिला गंभीर जखमी केले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईचा गळा चिरुन तिला गंभीर जखमी केले आहे. संबंधित महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा किशोर वयीन असुन हा इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. त्याला एका फोनमध्ये आपल्या आईचे कथीत प्रियकरासह अश्लील फोटो व व्हिडिओ सापडले. याचा त्याला राग आला व त्यानंतर त्यांनी हे कृत्य केले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी संबंधित युवकाला डोंगरी येथील बाल सुधार गृहात पाठवले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता घडल्याचे म्हटले जात आहे. मुलगा त्याच्या आईसोबत घरी होता. यावेळी आईच्या मोबाईलवर तो गेम खेळत होता. गेम खेळता खेळता आईचे आणि तिच्या कथित प्रियकराचे काही अश्लील व्हिडिओ व फोटो त्याला दिसले. यानंतर रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले.

पोलिसांनी सांगितले की, अश्लील फोटो पाहिल्यावर तरुण प्रचंड चिडला. तो स्वयंपाक घरात गेला. तिथून चाकू काढला आणि आईवर सपासप वार केले. महिलेला वाचवण्यासाठी शेजारच्यांनी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. पुढे महिलेचा सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तो पुढे म्हणाला, “किशोरने ही घटना पोलिसांना सांगितली.”

Written By: Dhanshri Shintre.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT