Telangana Crime News Saam Tv
क्राईम

Shocking News : संतापजनक! शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Telangana Crime News : हैद्राबादमध्ये शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षीय मुलावर पर्यवेक्षकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • तेलंगणातील बाल सुधारगृहात १० वर्षीय मुलावर पर्यवेक्षकाने केले लैंगिक अत्याचार

  • दसऱ्याच्या सुट्टीत मुलाने आईसमोर सांगितले भयावह सत्य

  • पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल

  • इतर मुलांवरही अत्याचार झाले आहेत का याचा तपास सुरू

तेलंगणा मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. धक्कदायक म्हणजे बाल सुधारगृहाच्या पर्यवेक्षकांकडूनच या मुलावर अत्याचार करण्यात आले. या घटनेने तेलंगणा हादरले असून. संबंधित पर्यवेक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना हैद्राबादच्या सईदाबाद परिसरातुन उघडकीस आली आहे. एक १० वर्षीय मुलगा शासकीय बाल सुधार गृहात राहत होता. दसऱ्याच्या सुट्टी निमित्त तो स्वतःच्या घरी परत आला. या दरम्यान तो खूप खूप शांत शांत राहत होता. एकटाच बसायचा, फारसा बोलायचं नाही. या सगळ्या हालचाली पाहता त्याच्या आईला काहीतरी चुकीचं घडलं असावं अशी चाहूल लागली.

क्षणभराचाही विलंब न करता मुलाच्या आईने त्याला जवळून घेऊन प्रेमाने कवटाळले आणि तू शांत का आहेस विचारलं. खूप वेळ मुलगा काही सांगत नव्हता. मात्र अखेर त्याचा अश्रूंचा बांध फुटला आणि त्याने रडत रडत आईला घडलेली हकीकत सांगितली. तो म्हणाला, तो राहत असलेल्या बाल सुधारगृहात त्याच्यावर पर्यवेक्षक लैंगिक अत्याचार करतात.

हे ऐकून पीडित मुलाच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने ताबडतोब पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. आईच्या तक्रारीवरून, सैदाबाद पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी आरोपी पर्यवेक्षकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलावर मे महिन्यापासून आरोपी पर्यवेक्षक अत्याचार करत होता. दरम्यान पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने संस्थेतील इतर मुलांविरुद्ध असेच गुन्हे केले आहेत का याचाही तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

SCROLL FOR NEXT