Buldhana Sanjay Gaikwad on Money Lenders Saam Tv News
क्राईम

कर्जापायी महिलेनं लेकीला राजस्थानमध्ये विकलं, राज्याच्या महिला सावकाराच्या घरात गहाण; शिंदेंच्या आमदारांचा गंभीर आरोप

Buldhana Sanjay Gaikwad on Money Lenders : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातली नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन एका सावकारावर गंभीर आरोप केले आहेत. सावकाराकडून आदिवासी बांधवांना, महिलांना होत असलेल्या त्रासाची आणि जाचाची माहिती त्यांनी दिली.

Prashant Patil

बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातली नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन एका सावकारावर गंभीर आरोप केले आहेत. सावकाराकडून आदिवासी बांधवांना, महिलांना होत असलेल्या त्रासाची आणि जाचाची माहिती त्यांनी दिली. 'कर्ज फेडता आलं नाही म्हणून अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्या सावकाराने चक्क कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच, काल परवा सावकाराने एका १२ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग केला. बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचा हैदोस वाढला आहे,' असं संजय गायकवाड यांनी सांगितलं.

'राज्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकरी, मजूर व गोरगरिबांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येतात. अनेकदा अशा प्रकरणात बड्या व्यक्तींना, पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सावकार आपली पोळी भाजत असतात. त्यामुळे, अवैध सावकारकीचा धंदा मांडलेल्यांना वेळीच आळा बसत नाही, किंवा त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला जात नाही. मात्र, आता चक्क आमदार महोदयांनीच सावकारकाविरुद्ध दंड थोपटले आहेत. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवल्या आहेत.' अनेक ठिकाणी सावकाराने व्याजाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या बायकांवर, त्यांच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा खळबळजनक आणि गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

'सावकारकीच्या कायद्याचा गैरवापर करुन हे हौदोस घालत आहेत. आम्ही या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ. या आदिवासी गावात सावकार शेतकऱ्यांच्या शेती हडप करत आहेत. जो सावकार पैशासाठी मुलीला विकायला लावतो, अशा सावकाराची मस्ती सरकारने उतरवावी. याबाबत मी विधासभेत आवाज उठवणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ह उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय द्यावा,' अशी मागणीही संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचे नाव घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT