Hariyana Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : संतापजनक! विद्यार्थ्याला शाळेच्या खिडकीला उलटं लटकवलं अन्..., धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Hariyana Crime News : हरियाणातील पानिपतमध्ये सात वर्षांच्या विद्यार्थ्याला गृहपाठ न केल्यामुळे स्कुल व्हॅन चालकाने खिडकीतून उलटं लटकवल्याची संतप्त घटना घडली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी पोलिसांत चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Alisha Khedekar

  • हरियाणातील पानिपतमध्ये ७ वर्षांच्या विद्यार्थ्याला स्कुल व्हॅन चालकाने अमानुष शिक्षा केली.

  • गृहपाठ न केल्याने स्कुल व्हॅन चालकाने मुलाला उलटं लटकवलं.

  • या घटनेचा व्हिडिओ पालकांच्या हाती लागला आहे.

  • पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

"छडी लागे छम छम, विद्या येई घम घम" ही कविता आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत मात्र या छडीचा अतिरेक झाला तर काय घडू शकतं याचे जीवंत उदाहरण हरियाणात पाहायला मिळालं आहे. शहरातील एका खाजगी शाळेत गृहपाठ पूर्ण केला नाही, म्हणून स्कुल व्हॅन चालकाने सात वर्षांच्या विद्यार्थ्याला खिडकीला बांधून उलटं लटकवल्याची संतप्त घटना घडली आहे. या घटनेनंतर पालकांनी पोलीस ठाण्यात व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणातील पानिपतमध्ये विराट नगर येथील सृजन पब्लिक स्कूलमध्ये एक विद्यार्थी इयत्ता दुसरीत शिकत होता. शाळेतील शिक्षकांनी त्याला गृहपाठ करण्यास अनेकदा बजावले मात्र त्याने गृहपाठ केला नाही. स्कुल व्हॅन चालकाला हे समजताच त्याने पीडित विद्यार्थ्याला कानाखाली मारली. तसेच त्याचे पाय दोरीने बांधले आणि शाळेच्या खिडकीला उलटं लटकवले.

ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडली असून शनिवारी या घटनेचा व्हिडिओ संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांच्या हाती लागला आहे. व्हॅन चालकाने विद्यार्थ्याला उलटं लटकवण्याचा आणि मारहाण करण्याचा व्हिडिओ पीडित मुलाच्या इतर मित्रांना दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न देखील केला. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आणि मॉडेल टाउन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी व्हॅन चालक अजयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.

जेव्हा पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेबद्दल जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले, त्यांना या व्हिडिओबद्दल काहीही माहिती नाही. तथापि, पीडित मुलाने त्याच्या आईला सांगितले की, अजय काकांनी त्याला खिडकीतून लटकवले, त्याआधी त्याला कानाखाली मारण्यात आली आणि घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला.

पोलिसांनी आरोपी स्कुल व्हॅन चालक अजयविरुद्ध बालगुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, अजय वारंवार मुलांशी अनुचित वर्तन करत असे आणि काही पालकांनी त्याच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती. अनेक तक्रारींनंतर अजयला काही दिवसांपूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा खोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा

Prasad Oak: 'शंभर चित्रपटांचा टप्पा गाठणं...'; 'वडापाव'च्या निमित्ताने प्रसाद ओकच्या चित्रपटांची 'शतकपूर्ती', अभिनेता म्हणाला...

India Vs Pakistan Match: ठाणे येथील हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, भारत-पाक मॅच सुरू असताना टीव्ही फोडले; पाहा VIDEO

'१० मिनिटांत तयार हो, तुझ्यासोबत शरीरसंबंध..' CMOकडून महिला डॉक्टरवर जबरदस्ती, शेवटी हार्ट अटॅकनं मृत्यू

Navratri Upvas: नवरात्रीचा उपवास कधी सोडावा?

SCROLL FOR NEXT