satara police arrested youths of nagar and beed for stealing gold chains in udayanraje bhosale rally Saam Digital
क्राईम

उदयनराजेंच्या लाेकसभा निवडणुकीचा निकाल लागताच मेढ्यातून त्यांनी गाड्या वळविल्या अन् डाव साधला, 5 अटकेत

satara police arrested youths of nagar and beed for stealing gold chains in udayanraje bhosale rally : या प्रकरणात पोलीस संबंधित टोळीकडून आणखी कुठे गुन्हे केले आहेत का याचा कसून तपास करत आहे.

ओंकार कदम

सातारा लोकसभा निवडणुकीच्या दिवशी निकालाचा कल उदयनराजे भाेसले यांच्याकडे येताच साता-यातील युवा वर्गात एकच जल्लाेष सुरु झाला. हजाराे युवक गुलालाची उधळण करीत रस्त्यावर आले बघता बघता उदयनराजेंची विजयी रॅली सुरु झाली. त्याचा फायदा उठवत मेढ्याच्या दिशेने गेलेले चाेरटे पुन्हा साता-यात आले. सर्व जण रॅलीत घुसले आणि काहींच्या साेनसाखळ्या लांबवल्या. दरम्यान युवकांच्या साेनसाखऴीवर डल्ला मारणा-या टाेळीला सातारा पाेलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

एसपी समीर शेख यांनी बुधवारी (ता. 26) माध्यमांना याबाबतची माहिती दिली. शेख म्हणाले लाेकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी काही लाेकांनी गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या साखळ्या चाेरल्या. त्याची नाेंद पाेलिसांत झाली हाेती.

या प्रकरणात सातारा पोलिसांनी बीड आणि नगर येथून 5 जणांच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये बाबासाहेब गायकवाड, रामदास सोमनाथ घुले, सचिन पवार,नितीन धोत्रे, अर्जुन मासाळकर यांचा समावेश आहे. या टोळीकडून 20 लाखांच्या साेनसाखळी तसेच 7 लाखांची कार असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विदर्भ भाजतोय! अकोला-वर्ध्यात तापमान ४५° पार, उष्णतेचा कहर

कोलकात्यात रिंकू सिंहचं वादळ, KKRने मिळवला पहिला विजय; अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत

Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार पोलिसांकडून सिल...

नेता अन् तरुणी बेडवर नको त्या अवस्थेत, अश्लील व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT