Sangli Crime News Saam Digital
क्राईम

Sangli Crime: मिरजमध्ये धाडसी चोरी, छताचा पत्रा कापून सराफ दुकान फोडले; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Crime News in Marathi: श्वानपथक दुकानापासून दोनशे मीटर अंतरावर जाऊन घुटमळल्याने चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

विजय पाटील

Sangali Crime News:

मिरज शहरातील सराफ कट्टा रस्त्यावरील सोन्या चांदीचे दुकान फोडून चोरट्यांनी चार तोळे सोने आणि सात किलो चांदी असा साडे पाच लाखाचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (२४ डिसेंबर) मध्यरात्री ही घटना घडली असून याप्रकरणी राहुल कदम यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Crime News in Marathi)

मिरज शहरात (Miraj) सराफ कट्टा येथे राहुल कदम यांचे आर के ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री (२३, डिसेंबर) ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री दुकानातील सीसीटीव्हीची वायर कापून शोकेसमधील चार तोळे सोन्याचे दागिने चांदीचे सात किलो दागिने लंपास केले.

रविवारी (२४, डिसेंबर) सकाळी राहुल कदम यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडल्यानंतर हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. तसेच चोरट्यांनी पत्रा कापण्यासाठी वापरलेला कटरही दुकानात सापडले. सोन्याचे आणखी दागिने लोखंडी तिजोरीत असलेल्याने ते चोरट्यांच्या हाती लागले नसल्याचेही राहुल कदम यांनी सांगितले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. श्वानपथक दुकानापासून दोनशे मीटर अंतरावर जाऊन घुटमळल्याने चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला असून मध्यरात्री दोन वाजता सीसीटीव्हीची वायर कापल्याचे निदर्शनास आले. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT