Miraj Hospital : मिरज शासकीय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार; रुग्णांच्या खाटांवर कुत्र्यांचा आराम

Miraj Government Hospital: मिरज येथील शासकीय रूग्णालयात रूग्णांच्या खाटांवर कुत्रे झोपा काढत असल्याचे फोटो समोर आले आहेत.
Miraj Hospital
Miraj HospitalSaam Tv
Published On

Miraj Government Hospital:

मिरज येथील शासकीय रूग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील रूग्णांच्या खाटांवर कुत्रे झोपा काढत असल्याचे फोटो समोर आले आहेत. या रुग्णालयाचे फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित पवार यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रूग्णांना उपचार घेण्यासाठी ठेवलेल्या खाटांवर कुत्रे झोपलेले दिसत आहेत. (Latest News)

हे फोटो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने रोहित पवार यांना पाठवले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो शेअर केल्यानंतर रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उपरोधिक टोला लगावला. दरम्यान तानाजी सावंत यांनी राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रात आरोग्य विभागाच्या योजनांची जाहिरात दिल्यावरूनही त्यांनी सवाल केला. रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. फोटो शेअर करताना रोहित पवार म्हणाले की, एका कार्यकर्त्यानं मिरज शासकीय रूग्णालयाचा हा फोटो पाठवला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येथे माणसांसोबत पाळीव प्राण्याचा उपचार केला जात असावा. ही योजना कालच्या जाहिरातीमध्ये देण्यास आरोग्यमंत्री विसरले असतील. या योजनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार प्राप्त होईल, शासनानं केवळ आरोग्यमंत्र्यांचे नामांकन करायला हवे. दरम्यान रूग्णालयाचे फोटो हे ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेत.

''स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत, पण माझ्या मतदारसंघात ४०% काम पूर्ण झालेल्या शासकीय दवाखान्यासाठी तसेच राज्यातल्या इतर भागात आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाकडे निधी पैसे नाहीत. अशा गलथान कारभाराला आता #THE_RISE_OF_HEALTHY_MAHARASHTRA म्हणायचं का?" असा सवाल रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये केलाय.

जाहिरातीमुळे आरोग्यमंत्र्यावर टीका

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची एक जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली. यात आरोग्यमंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा फोटो आहे. तसेच या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो आहेत. त्याचबरोबर नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या जी-२० परिषदेचा लोगो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या मोहिमेचा लोगोही या जाहिरातीत छापण्यात आलाय.

यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाने केलेली कामं आणि सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्यात आलीय. परंतु या जाहिरातीवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत राज्याच्या तिजोरीतल्या सामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही या जाहिरातीवरून सरकारला धारेवर धरलं.

Miraj Hospital
#shorts : Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार गटाच्या याचिकेवर रोहित पवार काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com