Yavatmal Crime News Saam TV
क्राईम

Yavatmal Crime News : यवतमाळ प्रशासन हादरलं, रेती माफियांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला; दाेघे गंभीर जखमी

फुलसावंगी परिसरात प्रचंड प्रमाणात रेती आणि मातीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal Crime News :

गौण खनिज तस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर रेती व माती माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी मोडके हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच महागाव तहसील कार्यालयाचे वाहन चालक आडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे. (Maharashtra News)

यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया (pankaj ashiya ias) यांनी महागाव तहसील कार्यालयात विभागनिहाय आढावा बैठक घेतली. या बैठकीत फुलसावंगी परिसरात प्रचंड प्रमाणात रेती आणि मातीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे. ही गौण खनिज तस्करी रोखण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महागाव तहसील कार्यालयाचे रात्र गस्ती पथक फुलसावंगी (fulsawangi) परिसरात पाहणी करीत असताना काळी टेंभी येथे मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. हे पथक कारवाई करण्यासाठी सरसावले असता दहा ते पंधरा जणांनी तलाठी मोडके यांच्यावर प्राण घातक हल्ला चढविला. तसेच तहसीलच्या वाहनाचे चालक आडे यांनाही मारहाण केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर मारहाण करणारे पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच तलाठी मोडके हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhui Dixit Hair Care Tips: माधुरी दिक्षीतने काळ्याभोर केसांचं रहस्य सांगितलं, 58 व्या वर्षीही लावते फक्त या 2 गोष्टी

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

SCROLL FOR NEXT