Sambhajinagar Crime News  Saam Tv
क्राईम

Crime News: संभाजीनगरमध्ये 'दृश्यम-2 ची पुनरावृत्ती; आठ खड्ड्यांमुळे 14 महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा

Avinash Salve Death Case: संभाजीनगरमध्ये 14 महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. मृतदेह शोधण्यासाठी 8 खड्डे खोदण्यात आले आहेत. संभाजीनगरमध्ये 'दृश्यम-2 ची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Rohini Gudaghe

Sambhajinagar Crime News Drishyam 2 scene

छत्रपती संभाजीनगरमधून (Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहर हादरलं आहे. एका हत्या प्रकरणात संभाजीनगरमध्ये 'दृश्यम-2 ची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं आहे. नक्की काय प्रकरण घडलं, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

छत्रपती संभाजीनगरमधून १४ महिन्यांपूर्वी एक खून झाल्याची घटना घडली होती. तिचा आता उलगडा झाला आहे. या प्रकरणात मृतदेह शोधण्यासाठी आठ खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे शहरामध्ये मोठी खळबळ माजली आहे. या घटनेनं छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा दृश्यम चित्रपटाचा पार्ट 2 (Drishyam 2) पाहायला मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

14 महिन्यांपूर्वी हत्या

छत्रपती संभाजीनगर शहरात १४ महिन्यांपूर्वी अविनाश साळवे खून प्रकरण ( Avinash Salve Death Case) घडलं होतं. आरोपीने मृतदेह वाल्मी परिसरात जलवाहिनीच्या कामाच्या ठिकाणी पूरला होता. क्रांती चौक पोलीस आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले. त्यांनी या जागेत 8 ठिकाणी 12 फूट खोल खड्डे खोदले. त्यानंतर पोलिसांच्या हाती 4 ते 5 मानवी हाडे लागले आहे.

14 महिन्यांपूर्वी हत्या करून पुरलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. याप्रकरणी अविनाश साळवे यांचा चुलत भाऊ राहुल साळवे यानेच हा खून केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान खड्ड्यामध्ये मिळालेले हाडांचे तुकडे (Dead Body) फॉरेनसिक विभागाला पाठवून, डीएनए चाचणीनंतर ते कोणाचे आहेत, हे निष्पन्न होईल.

अविनाश साळवे खून प्रकरण

समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल साळवेने 14 महिन्यांपूर्वी अविनाश साळवेचा खून केला होता. त्यानंतर घटनास्थळी मृतदेह तसाच टाकून तो घरी परतला (Sambhajinagar Crime) होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा तो घटनास्थळी गेला. तेव्हा दहा ते पंधरा कुत्रे त्या मृतदेहाचे लचके तोडत होते. आरोपीने या कुत्र्यांना हाकललं होतं. तोपर्यंत त्या जागेवर केवळ हात आणि शरीराचे काही अवशेषच शिल्लक राहिले होते.

आरोपीने उरलेले शरीराचे तुकडे जलवाहिनीत पुरले (Sambhajinagar News) होते. पोलिसांनी खड्ड्यांमधून मृतदेहाचे अवशेष जप्त केले आहेत. ते आता फॉरेन्सिक विभागाला पाठवण्यात आले आहेत. डीएनए चाचणीनंतरच ते अवशेष नेमके कोणाचे आहेत हे स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Election : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप, ५२ पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपला जाहीर पाठिंबा!

SCROLL FOR NEXT