Sambhajinagar Crime Saam tv
क्राईम

Crime: संभाजीनगरमध्ये रक्तरंजित थरार, तरुणाकडून तिघांवर कोयत्याने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू

Sambhajinagar Police: संभाजीनगरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका व्यक्तीने ३ तरुणांवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संभाजीगनरमध्ये खळबळ उडाली.

Priya More

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात तिघांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत ही भयंकर घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केले. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि एकाने तिघांवर सुऱ्याने सपासप वार केले. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मित्राला शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणातून चिकन शॉपवर काम करणाऱ्याने तीन तरुणांवर मांस कापायच्या सुऱ्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

डोके, छातीत सुरा खुपसला गेल्याने नितीन सोनाजी संकपाळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ आणि मित्र दत्ता बालाजी जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. रात्री 9 वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या पुढे असणाऱ्या चिकन शॉपसमोर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन संकपाळ, सचिन संकपाळ आणि दत्ता जाधव हे तिघे जण गप्पा मारत बसले होते. तेव्हा कुरेशीच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना याचा मित्र समीर शेखसोबत त्यांचा वाद झाला.

समीर शेखने शिवीगाळ करीत तिघांना धक्काबुक्की केली. मस्तान कुरेशीने अचानक वादात उडी घेत तिघांना शिवीगाळ करून खुनाची धमकी दिली. आधी शाब्दीक बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की नंतर हाणामारी झाली. त्यानंतर मस्तान कुरेशीने दुकानातून सुरा आणून तिघांवरही हल्ला चढवला. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. यामधील नितीनचा जागीच मृत्यू झाला. संभाजीनगर पोलिसांनी मध्यरात्री आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT