Baba Siddiqui Death yandex
क्राईम

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

baba siddiqui : . सलमान खान याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या 'सुक्खा कालूयाला' पानिपत येथून अटक करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई मध्ये १२ ऑक्टोबरला बाबा सिद्धी यांची खेरवाडी येथे गोळ्या झाडून करण्यात हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर आता सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यातच सलमान खानच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाला. सलमान खान याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या 'सुक्खा कालूयाला' पानिपत येथून अटक करण्यात आली होती. गुन्हेगाराला हरियाणा येथून नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रात आणलं आहे.

पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली आहे. सुक्खा कालूयाला रात्री पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आज सुक्खा कालूया याला पनवेल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणे आणि जीवे मारण्याची सुपारी घेतल्या प्रकरणी सुक्खा कालूयाला वर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सुक्खा कालूया हा अनेक महिन्यापासून फरार होता. सुक्खा कालूयाला हा बिष्णोई गँगचा शार्प शुटर असल्याचे समोर आले आहे. सुक्खा कालूयाला अटक केल्याने सलमान खान प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यता.

अभिनेता सलमान खानला याआधी पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊस वर जात असताना त्याला लक्ष्य करण्याचा प्लॅन करण्यात आला होता. त्यानंतरच एप्रिल 2024 मध्ये त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला आहे. आता पुन्हा धमकी त्याला येत आहे. त्याचसोबत वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअप वर धमकीचा मेसेज आला आहे. त्यात 'लॉरेन्स बिश्नोई सोबतच शत्रुत्व संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांची केली मागणी' केली आहे.

खंडणी न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करण्याचा धमकीचा उल्लेख या धमकीत केला आहे. धमकीच्या मेसेज नंतर पोलीस सतर्क झाले आहेत. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याला ट्रेस करण्यास पोलिसांकडून सूरुवात झाली आहे.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT