Ratnagiri Crime Saam Tv
क्राईम

Crime: गरोदर गर्लफ्रेंडची हत्या, सीरियल किलर निघाला बॉयफ्रेंड; आरोपीने चौघांचा जीव घेतला

Ratnagiri Crime: रत्नागिरीमध्ये एका तरुणाने आपल्या गरोदर गर्लफ्रेंडची हत्या केली. या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. बॉयफ्रेंडनेच या तरुणीची हत्या केली होती. आरोपी हा सीरियल किलर असून त्याने एकूण ४ जणांची हत्या केली.

Priya More

रत्नागिरीतील भक्ती मयेकर हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले आहे. या प्रकरणातील आरोपी दुर्वास पाटीलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दुर्वासने त्याची गर्लफ्रेंड भक्ती मयेकरची निर्घृण हत्या केली. भक्ती मयेकर गरोदर होती. तिच्या पोटामध्ये असलेल्या बाळाचा देखील मृत्यू झाला. या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुर्वास पाटीलने फक्त भक्तीच नाही तर एकूण चार जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

पोलिस तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुर्वास पाटीलने आधी ५० वर्षीय सीताराम वीर या व्यक्तीची हत्या केली. सीताराम हे सायली बारमध्ये काम करत होते. हा बार दुर्वासच्या वडिलांच्या नावावर होता. यापूर्वी दुर्वासने खंडाळा येथे २८ वर्षीय राकेश जंगम या तरुणाची हत्या केली होती. पोलिस तपासादरम्यान पोलिसांना खंडाळ्यातून राकेशच्या बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना दुर्वासवर पोलिसांना संशय आला. चौकशीदरम्यान दुर्वासने आपला गुन्हा कबुल केला होता.

दुर्वास पाटीलचे भक्ती मयेकरसोबत अनैतिक संबंध होते. भक्ती गरोदर होती. जेव्हा ती त्याच्या कामामध्ये अडथळा ठरू लागली तर त्याने तिची हत्या केली. भक्तीचा मृतदेह त्याने दोन मित्रांच्या मदतीने दरीमध्ये फेकून दिला. भक्तीची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर १४ दिवसांनी भक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी दुर्वासची कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. यादरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने भक्तीसह चौघांची हत्या केली असल्याचे सांगितले. आधी दोघांची आणि नंतर भक्ती आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाची त्याने हत्या केली.

दुर्वासला अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करण्यास सुरूवात केली. दुर्वासचे वागणे एकाद्या कथित गुन्हेगारासारखे होते. या हत्याकांड प्रकरणामुळे रत्नागिरीमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दुर्वासला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पोलिस सध्या कसून तापस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT