Ratnagiri Crime Saam tv
क्राईम

Ratnagiri Crime : वडिलांनी घेतलेल्या कर्जातून त्रस्त मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव; रक्ताच्या थारोळ्यात आईला पाहून आत्महत्येचा प्रयत्न

Ratnagiri News : स्वतःच्या हाताची नस कापल्याने गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे

अमोल कलये

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात आज सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. यात मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर आईला मारल्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  

रत्नागिरी शहरातील शांतीनगर परिसरात आज सकाळच्या सुमारास हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पूजा शशिकांत तेली असं मृत महीलेचे नाव आहे. तर तिचा मुलगा अनिकेत तेली याने धारदार चाकूने वार करत हत्या केली. रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या नाचणे गावातील सुपल वाडी येथे पूजा तेली आणि त्यांचा मुलगा अनिकेत राहत होते. आज सकाळी अनिकेतने अज्ञात कारणातून आईच्या गळ्यावर वार केला. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून अनिकेतने स्वतःच्या हाताची नस कापून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. 

रक्तबंबाळ अवस्थेत घराबाहेर येऊन बसला 

आईचा गळा कापल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेला अनिकेत घराबाहेर येऊन बसला. तेव्हा शेजाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. अनिकेतच्या शेजारीच त्याचे काका राहतात. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

वडिलांच्या कर्जामुळे होता त्रस्त 

दरम्यान वडिलांनी घेतलेल्या कर्जामुळे त्रस्त झाल्याने यातून मुलाने भयानक कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती आहे. या नंतर अनिकेत आणि त्याची आई पूजा हे राहत होते. तर शेअर बाजारातील उलाढालीतून झालेल्या कर्जामुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Wednesday : गणेश चतुर्थीला मिळणार ८ राशींना विशेष लाभ; बुधवारचे राशीभविष्य

Mulher Fort : नाशिकला गेल्यावर करा मुल्हेर किल्ल्याची सफर, ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: न्यायालय आम्हाला परवानगी देईल ,आम्ही सगळे नियम आणि अटी पाळून आझाद मैदानावर उपोषण करणार- मनोज जरांगे

Pune School: शिक्षणाचा बाजार मांडलाय यांनी...फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांचे फोटो केले व्हायरल | VIDEO

Dharashiv: स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत ५ पोलिस जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT