RAJASTHAN SIKAR TEACHER RAPE CASE: Teacher sentenced to 20 years in prison for raping student Saam Tv
क्राईम

Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

Rajsthan Crime News : राजस्थानच्या सीकरमध्ये खाजगी कोचिंग शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • राजस्थानच्या सीकरमध्ये धक्कादायक घटना

  • खाजगी कोचिंग शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला

  • याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

  • शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी घटना

राजस्थानच्या सीकर मधून संतापजनक माहिती समोर आली आहे. एका खाजगी कोचिंगच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला हॉटेलवर नेवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ६० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी घटना असल्याचे म्हटले जात आहे.

विशेष सरकारी वकील भवानी सिंग जर्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर २०२३ रोजी पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, श्री गंगानगर जिल्ह्यातील गोविंदपुरा येथील रहिवासी हेमंत कुमार याने विद्यार्थिनीला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा एका खाजगी कोचिंगमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.

या प्रकरणाचा निकाल देताना पॉक्सो न्यायालयाचे पीठासीन अधिकारी विक्रम चौधरी यांनी कठोर शब्दांत निरीक्षण नोंदवले. भारतीय संस्कृतीत शिक्षकाला देवापेक्षाही मोठे स्थान दिले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा मार्गदर्शक मानला जातो. मात्र आरोपीने विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करून या पवित्र नात्याला कलंक लावल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि पीडितेचा जबाब महत्त्वाचा ठरला. सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे मान्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT