Rajasthan Crime News  Saam Tv
क्राईम

Crime: अनैतिक संबंधासाठी बायकोचं हादरवणारं कृत्य, बॉयफ्रेंडची मदत घेतली, नवऱ्यासोबत केलं असं काही की...

Rajasthan Crime News: राजस्थानमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. बायकोनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. भररस्यात चाकूने सपासप वार करत तरुणाला संपवण्यात आले.

Priya More

Summary -

  • राजस्थानमध्ये एका तरुणाची निर्णृण हत्या करण्यात आली

  • बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची गळा चिरून हत्या केली

  • या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली

  • या हत्याकांडामुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली

राजस्थानमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. बायकोने बॉयफ्रेडच्या मदतीने नवऱ्याला संपवले. गळा चिरून नवऱ्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राजस्थान हादरले आहे. भररस्त्यात धारधार शस्त्राने वार करत आणि गळा चिरून तरुणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना बोरवाड रोडवर २९ नोव्हेंबर २०२५ रोडी घडली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबरला हत्याकांडाची ही घटना घडली होती. पोलिसांना रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या तरुणाच्या पाठीवर आणि संपूर्ण शरीरावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले होते. सुरूवातीला या तरुणाच्या रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. पण शवविच्छेदन अहवालातून या तरुणाची हत्या झाल्याचे कळाले. पोलिस तपासातून या तरुणाची हत्या त्याच्याच बायकोने केल्याची माहिती समोर आली.

पोलिस तपासात समोर आले की, तरुणाच्या बायकोनेच प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढला. सात दिवसांत पोलिसांनी या प्रकरणी तरुणाची बायको, तिचा बॉयफ्रेंड आणि आणखी एकाला अटक केली. हत्या झालेला व्यक्तीचे नाव सुरेंद्र दादरवाल(२४ वर्षे) होते. तो शिक्षक होता. त्याचे लग्न २०१८ मध्ये रेखासोबत (२१ वर्षे) झाले होते. लग्नानंतर त्याची बायको रेखामध्ये बरेच बदल झाले. ती पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेली त्याठिकाणी त्याचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. रेखाने प्रेमसंबंधातून नवऱ्या सुरेशची हत्या केली.

आरोपींनी चोरीची दुचाकी हत्याकांडात वापरली. २९ नोव्हेंबरला रेखाने तिच्या बॉयफ्रेंडला नवरा घरातून निघाला असून तो बोरवाडला जात असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींनी सुरेशचा पाठलाग करत सुरेंद्रला रस्त्यात थांबवले. त्यांनी आधी सुरेंद्रची गाडी अडवून त्याला हेल्मेट काढायला सांगितले. त्यानंतर आरोपींनी चाकूने सुरेंद्रवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. सुरेंद्रची हत्या झाल्याचे समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला

Zilla Parishad election : या झेडपीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी, अजित पवारांचं मोठं वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले

Ladki Bahin Yojana : eKYC ची मुदत वाढली की नाही? लाडक्या बहि‍णींच्या सरकारकडे नजरा, वाचा नवीन अपडेट

Turichya Danyacha Zunka Recipe : जेवणाचा गावरान बेत; गरमागरम भाकरी अन् तुरीच्या दाण्याचा झुणका, वाचा रेसिपी

Gharoghari Matichya Chuli : जानकी अन् हृषीकेशच्या वर्तमानावर भूतकाळाचं सावट; नवा प्रोमो पाहून बसेल धक्का-VIDEO

SCROLL FOR NEXT