Rajsthan Sikar Girl Rape News Saam tv
क्राईम

Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; सोशल मीडियावर मैत्री करणं पडली महागात

Rajsthan Crime News : राजस्थानच्या सीकरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • सीकरमध्ये तरुणीने गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली

  • सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तीवर आरोप

  • लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा दावा

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

Rajsthan Sikar Girl Rape News : राजस्थानच्या सीकरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत या तरुणीवर अत्याचार केले. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी राजस्थानमधील सीकर येथे आली होती. यादरम्यान सोशल मीडियावर तिची ओळख एका तरुणाशी झाली. त्या दोघांमध्ये दररोज संवाद व्हायचा. त्यांची चांगली मैत्री झाली होती. कालांतराने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

याचाच फायदा घेत तरुणाने वारंवार शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने तरुणाकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता, मात्र आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. तरीही तरुणीने न थांबता आरोपीकडे लग्नाची मागणी केली. आरोपीने पीडितेला बदनामी आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

आपल्या जीवाला धोका आहे, आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच तिने पोलीस ठाणे गाठले. सदर तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT