Rajasthan Crime Saam Tv
क्राईम

Rajasthan Crime: पोटच्या मुलाचे राक्षसी कृत्य, आई- वडिलांसह बहिणीची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

Rajasthan Crime: पडुलकान येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने धारदार शस्त्राने वार करत आई - वडील आणि बहिणीची हत्या केली. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

Rajasthan Crime News:

राजस्थानच्या नागौरमधून तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. पडुलकान येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने धारदार शस्त्राने वार करत आई - वडील आणि बहिणीची हत्या केली. इतकेच नव्हेतर हत्येनंतर तरुणाने स्वतः : पडुकलन पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News in Marathi)

राजस्थानमध्ये तिहेरी हत्याकांड...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना पादुकला पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभार मोहल्ला येथे घडली. या परिसरात राहत असलेले रहिवासी जगदीश सिंह यांचा मुलगा दिलीप सिंह (वय, ४५), दिलीपची पत्नी राजेश कंवर (४२) आणि मुलगी 15 वर्षांची पिंकी एका खोलीत झोपले होते.

रविवारी (३१, डिसेंबर) रात्री दिलीप यांचा मुलगा मोहित रात्री उशिरा घरी पोहोचला होता. घरी आल्यानंतर त्याने आई, वडील आणि बहिणीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करुन तो पोलिसात हजर झाला व संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनाला पाठवण्यात आले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारण काय?

दरम्यान, या हत्याकांडानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पैशाच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आरोपीला मोबाईलचे व्यसन होते. तासनतास तो मोबाईल वापरत बसायचा, ज्यावरुन आई वडिलांसोबत त्याचे वाद होते. याच वादातून हे भयंकर कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT