Raigad news minor girl raped by her own father Saam Tv
क्राईम

Raigad News : बापलेकीच्या नात्याला काळीमा! वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 7-8 वर्षांपासून सुरू होता छळ

Raigad Crime News : रायगडच्या महाडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार केल्याची घडना घडली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

Yash Shirke

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Raigad News : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये किळसवाणी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बापले‍कीच्‍या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेवर तिचे वडील मागील सात ते आठ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. या जाचाला ती मुलगी कंटाळली होती. त्रास असह्य झाल्याने तिने अखेर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. ही माहिती मिळताच पोलीस आरोपीला अटक केली.

पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंब महाड तालुक्यातील एका गावातल्या चाळीत राहत होते. ते उत्तर प्रदेशहून स्थलांतर करुन महाडमध्ये वास्तव्याला राहण्यासाठी आले होते. चाळीतल्या घरात मागच्या काही वर्षांपासून आरोपी त्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता अशी माहिती समोर आली आहे.

आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या गंभीर प्रकरणाचा तपास सुरु आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT