Raigad Crime Saam tv
क्राईम

Raigad Crime: कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड; गर्वभवती महिलेसह नवरा आणि मुलाला संपवलं

Raigad Crime: रायगडमध्ये तिहेरी हत्याकांड झाल्याने कर्जत तालुका हादरलाय. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम, साम प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडलीय. अज्ञाताने गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा खून करण्यात आलीय. कर्जत तालुक्यातील चिकन पाडा येथे घटना घडलीय. चिकन पाडा येथे ३५ वर्षीय तरुण, गरोदर पत्नी आणि मुलगा यांचे धारधार हत्याराने वार करून हत्या करण्यात आलीय. या हत्या घटनेने कर्जत तालुका हादरला आहे. दरम्यान नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय.

मदन पाटील वय वर्ष ३५,अनिशा पाटील वय वर्ष ३२ आणि विनायक पाटील वय वर्ष ८ अशी मृतांची नाव आहेत. आधी चिकन पाडा येथे असलेल्या नाल्याच्या पाण्यात मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता इतर दोन मृतदेह ग्रामस्थांना दिसून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाच्या कपाळावर तर महिलेच्या कानशिलावर धारधार शस्त्राच्या जखमा झाल्या असल्याचे समोर येत आहे. हत्याकांड का घडल असाव याच कारण आणि मारेकरी समोर आलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या प्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाचा भावाला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मृत महिला ही सात महिन्यांची गरोदर असून त्या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचे खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन पाटील यांच्या घरात त्यांचा भाऊ देखील राहत होता. दोन्ही भावांमध्ये वाद झाला होता, त्यातून ही घटना घडली असावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savitribai Jyotirao Phule Serial: टीव्हीनंतर आता यूट्यूबवर; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात

Maharashtra News Live Update: नागपुरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT