rahul mahendra jaiswal passed away saam tv
क्राईम

Ulhasnagar Crime News : पहाटेच्या सुमारास उल्हासनगरमध्ये राडा, पूर्ववैमन्यासातून युवकाची हत्या

या घटनेने येथील वाल्मीक नगर, इमलीपाडा तसेच फॉरवर्ड परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेचा तपास मध्यवर्ती पोलिस तसेच फॉरेन्सिक टीम करीत आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News :

उल्हासनगर मध्ये आज (गुरुवार) पहाटे एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समाेर आली आहे. प्राथमिक माहितीनूसार डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची हत्या करण्यात आली. राहुल महेंद्र जयस्वाल (rahul mahendra jaiswal passed away) (वय 25) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. (Maharashtra News)

ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन भागात असलेल्या इमलीपाडा परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. राहुल जयस्वाल हा इमलीपाडा परिसरात आला हाेता. त्यावेळी काही तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून त्याला मारहाण केली.

तरुणांनी त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही हत्या पूर्ववैमन्यासातून झाली असल्याची चर्चा दबक्या आवाजात हाेऊ लागली आहे. या घटनेने येथील वाल्मीक नगर, इमलीपाडा तसेच फॉरवर्ड परिसरात खळबळ माजली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनास्थळी मध्यवर्ती पोलीस तसेच फॉरेन्सिक टीम पोहोचली असून घटनेचा पंचनामा केला जात आहे. राहुल जयस्वाल याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT