रिक्षातून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोकड लुटल्याचे उघड झाले आहे
पोलिसांनी ३० मोबाईल, चाकू आणि रिक्षा जप्त केली आहे
या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
पुणे शहर हे सुशिक्षित शहरांपैकी एक आहे. शहरात अनेक ठिकाणांहून विद्यार्थी शिकण्याच्या उद्देशाने येतात. मात्र या शिक्षणाच्या पंढरीत गुन्हेगारीचं जाळं दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाढवळ्या तसेच मध्यरात्री नागरिकांना लुटलं जात आहे. अशीच एक पुण्यात चोरीची घटना घडली आहे. चाकुचा धाक दाखवुन प्रवाशांना रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. फैजान मोहम्मद गौस शेख असे रिक्षा चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना काही व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी हडपसर भागात आल्याची माहिती मिळाली होती. पोलीस त्याठिकाणी पोहचताच तिथे असलेल्या रिक्षा चालकाने रिक्षा चालू करून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या रिक्षा चालकाचा प्रयत्न फसला. पोलिसांनी फैजान मोहम्मद गौस शेख व दोन अल्पवयीन तरुणांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
चोरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांना त्यांच्याकडे एक मोबाईल आणि एक धारदार चाकू रिक्षा मध्ये आढळून आला. तसेच या चौकशीत शेख ने सांगितले की दोन महिन्यांपूर्वी तिघांनाही पैशाची गरज होती. या गरजेपोटी त्यांनी मिळून एक रिक्षा भाड्याने घेतली. या रिक्षातून लोकांना लुटण्याचे त्यांनी ठरवले.
त्याप्रमाणे या तिन्ही चोरट्यांनी पुणे स्टेशन येथुन एका प्रवाशाला शिवाजीनगर येथे सोडतो असे सांगितले. शेख याच्या सांगण्यावरून प्रवासी रिक्षात बसला. मात्र शेख याने रिक्षामध्ये बसवून त्याला टर्फ क्लब रेसकोर्स भैरोबानाला पुणे येथे निर्जन स्थळी नेले. तिकडे नेऊन प्रवाशाला चाकुचा धाक दाखवुन त्याच्याकडील एक मोबाईल व रोख रक्कम असे काढून घेतले. अशाच प्रकारे या तिघांनी बऱ्याच जणांना लुटल्याचं चौकशीत समोर आलं आहे. पोलिसांनी शेख आणि इतर तीन आरोपींकडून ३० मोबाईल, चाकू आणि एक रिक्षा जप्त केली. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.