Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

Crime News: पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाखांची डिजिटल अरेस्ट फसवणूक उघडकीस आली. रिल्स्टार रोहन जाधव, ५,४३६ बँक खाती आणि हाँगकाँग कनेक्शन तपासात समोर आले.

Shruti Vilas Kadam

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

Crime News: पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख रुपयांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या रिल्स्टार रोहन जाधव याने फसवणुकीची रक्कम तब्बल ५ हजार ४३६ विविध बँक खात्यांमध्ये वळवल्याचे तपासात समोर आले आहे. या तपासातून रोहन जाधवचे हाँगकाँग कनेक्शनही उघड झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला फोन करून आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. संबंधित व्यक्ती एका गुन्ह्यात आरोपी असल्याचे सांगत त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात आली. या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने सायबर गुन्हेगारांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये तब्बल १० कोटी ७४ लाख रुपये जमा केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी हर्षद सुभाष धनतोले, समर्थ सुरेश देशमुख आणि अमर शिवाजी अत्तरगी या तिघांना अटक केली होती. यातील काही आरोपींनी एटीएममधून फसवणुकीची रक्कम काढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपी हर्षद धनतोले याने एटीएममधून काढलेली रक्कम रोहन जाधव याच्याकडे दिल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले. त्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार रोहन जाधव असल्याचा पोलिसांना संशय आला. रोहन जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून सोशल मीडियावरील एक रिल्स्टार असल्याचे तपासात समोर आले. तो सेलिब्रिटी मॅनेजमेंटचे कामही करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी पिंपळे निलख येथील त्याच्या घरी पोलिसांनी शोध घेतला. मात्र तो तेथे सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले. अखेर रोहन जाधवने न्यायालयात आत्मसमर्पण केले.

तपासात रोहन जाधवने फसवणुकीतील १० कोटी ७४ लाख रुपये तब्बल ५ हजार ४३६ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवल्याचे समोर आले आहे. तसेच टेलिग्रामच्या माध्यमातून त्याची हाँगकाँगमधील काही व्यक्तींशी ओळख झाली होती. त्यांच्यासोबत तो व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होता. हाँगकाँगमधील व्यक्तींशी यूएसडीटी या स्टेबलकॉइनच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. भारतातून परदेशी चलनात पैसे ट्रान्सफर करून देण्यासाठी जाधवला कमिशन मिळत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. जाधवविरोधात पुण्यात दोन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

चोरांनी रात्री दुकान फोडलं, २२ किलो चांदी लंपास केली; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

बीड पुन्हा हादरलं! पेट्रोलपंपाजवळ गोळीबाराचा थरार; वाल्मीक कराड कनेक्शन आलं समोर

Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

पैसे अपूर्ण मिळाले म्हणून 'खरेदीखत' अवैध ठरत का? मालकी हक्क कोणाचा असतो, सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय काय?

SCROLL FOR NEXT