पुणे पोलिसांनी शहर आणि परिसरात दरोडे आणि घरफोड्या करणार्या सराईत टोळीला अटक केलीय. पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीतील ११ जणांना अटक केलीय. पुणे पोलिसांनी फुरसुंगीजवळ या दरोडेखोरांना अटक करून तब्बल १७३ गुन्हे उघडकीस आणलेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सुमारे १ कोटी २१ लाख ४१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे पोलिसांना या दरोडेखोरांकडे पिस्तूल तसेच धारदार हत्यारं जप्त केली आहेत. तसेच त्यांच्याकडून जवळपास सव्वा किलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, तीन पिस्तूल,१४ जिवंत काडतूस असे आणि चोरीची दहा वाहने यामध्ये सहा वाहने ही चार चाकी तर चार वाहने दुचाकी असा एकूण १ कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
या अटकेच्या कारवाईविषयी माहिती देताना अप्पर पोलीस आयुक्त म्हणाले की, ९ सप्टेंबर २०२३ रोजी हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दरोडा पडला होता. या दरोडाचा तपास केला जात होता. हा दरोडा टाकण्यात याच आरोपींचा हाथ असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांना जेव्हा या दरोडेखोरांची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी सापळा रुचून यांना अटक केली. अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय २३, रा. मांजरी), बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड (वय २५, रा. वैदुवाडी, हडपसर), रामजितसिंग रणजितसिंग टाक, मनीष बाबुलाल कुशवाह, रामजीतसिंग रणजीतसिंग टाक, राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड, कणवरसिंग काळूसिंग टाक, लखनसिंग राजपूतसिंग दुधाणी (सर्व रा. रामटेकडी, हडपसर), रोहितसिंग सुरेंद्रसिंग जुनी (रा. फुरसुंगी), अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे या वेळी उपस्थित होते. गुन्हे शाखेच्या युनिट तीन, युनिट दोन, खंडणी विरोधी पथक आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.