Pune News Saam Tv
क्राईम

Pune : चित्रपट पाहताना बायकोला सस्पेन्स सांगत होता, शेजारी बसलेले संतापले, चित्रपटगृहात राडा अन् हाणामारी

Pune News : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ‘द कॉन्ज्युरिंग – लास्ट रीट्स’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान हाणामारी. प्रेक्षकाने मोठ्याने सस्पेन्स सांगणाऱ्या व्यक्तीस शांत राहण्यास सांगितल्यावर हा गोंधळ घडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • पिंपरी चिंचवडमधील मल्टीप्लेक्समध्ये कॉन्ज्युरिंग चित्रपटादरम्यान मारामारी

  • पत्नीला मोठ्याने कथा सांगणाऱ्या व्यक्तीस शांत राहण्यास सांगितल्याने वाद

  • तक्रारदार व त्याच्या पत्नीवर आरोपी आणि त्याच्या पत्नीने हल्ला केला

  • पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला, तपास सुरू आहे

सध्या ‘द कॉन्ज्युरिंग – लास्ट रीट्स’ हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मात्र पुण्यात या चित्रपटाच्या स्क्रिनींग दरम्यान मारामारी झाल्याची घटना घडली आहे. चित्रपटात पुढे काय होणार हा सस्पेन्स एक व्यक्ती आपल्या बायकोला मोठ्या आवाजात सांगत होता. यादरम्यान आजूबाजूच्या प्रेक्षकांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रेक्षकाने त्यांना शांत राहण्यास सांगितल्याने त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका मल्टीप्लेक्समध्ये ‘द कॉन्ज्युरिंग – लास्ट रीट्स’ हा हॉरर चित्रपट दाखवला जात होता. स्क्रीनिंग दरम्यान एका व्यक्तीने आपल्या बायकोला चित्रपटात पुढे घडणाऱ्या घटनांबद्दल सांगत होता. त्यामुळे आजूबाजूच्या प्रेक्षकांना त्रास होत होता. संतप्त झालेल्या एका प्रेक्षकाने त्यांना शांत राहण्यास सांगितले.

उलट त्याने संतापाच्या भरात तक्रारदाराशी उर्मटपणे बोलणे सुरू केले. काही वेळातच वाद वाढला आणि आरोपीने तक्रारदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर तक्रारदाराच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिच्यावरही हल्ला केला. या धक्कादायक घटनेमुळे काही काळ चित्रपट गृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर तक्रारदारास किरकोळ दुखापत झाली असून त्याने तत्काळ चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११७ (सार्वजनिकरित्या गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), कलम ११५ (प्रेरणा देणे), कलम ३५२ (हल्ला) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि तपास सुरू आहे. दरम्यान, चित्रपटगृह प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची दक्षता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT