Pune Online Fraud Case Saam Digital
क्राईम

Pune Online Fraud Case: ऑनलाईन हॉटेल बुकिंग पडलं महागात, उच्चशिक्षित तरुणीला घातला तीन लाखांचा गंडा

Pune Online Fraud Case: महाबळेश्वर येथे ऑनलाइन हॉटेल बुकिंग करणे एका उच्चशिक्षित तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. सायबर चोरट्यांनी परस्पर तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.

Sandeep Gawade

Pune Online Fraud Case

महाबळेश्वर येथे ऑनलाइन हॉटेल बुकिंग करणे एका उच्चशिक्षित तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. सायबर चोरट्यांनी परस्पर तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाघोली येथील उच्चशिक्षित तरुणीला ख्रिसमसनिमित्त महाबळेश्वरला जायचं होतं. त्यासाठी महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी तिला हॉटेलची गरज होती. त्यामुळे तिने ऑनलाईन माहिती घेत द कीज हॉटेलमध्ये रूम घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत हॉटेलचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर क्राईम अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून लोणीकंद पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेरूळमध्ये तरुणीवर भिकाऱ्याने केला जीवघेणा हल्ला

नवीन मुंबईत एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने प्रहार केला. नंतर त्याचं फुटलेल्या काचेच्या बाटलीने तिच्यावर सपासप वार केले. ज्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनांतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इमाम हसन शमशुद्दीन, असं या हल्लेखोरचं नाव आहे. या 21 वर्षीय पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT