Indapur crime  Saam Tv
क्राईम

Indapur Firing : महाराष्ट्रात पुन्हा गोळीबार; हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या युवकाची निर्घृण हत्या

Indapur Firing News Update : इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर बाह्यवळण मार्गावर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबलेल्या युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मंगेश कचरे

Indapur Crime news :

इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर बाह्यवळण मार्गावर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबलेल्या युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाची अज्ञात पाच ते सहा जणांनी गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविनाश बाळू धनवे असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूरमधील हॉटेल जगदंबामध्ये शनिवारी सायंकाळी आठ वाजत्याच्या सुमारास अविनाश धनवे आणि अन्य तिघे असे एकूण चौघे जण जेवणासाठी थांबले. चौघेही चारचाकीने हॉटेलपर्यंत पोहोचले. चौघेही जण हॉटेलमध्ये जाऊन बसले असतानाच पाठीमागून चारचाकीने आलेल्या पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी अविनाश यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला. या घटनेत अविनाश धनवे याचा जागीच मृत्यू झाला.

अविनाश धनवे यांची निर्घृण हत्या का झाली, या संपूर्ण हत्यांकाडाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळाला भेट देत तपास सुरु केला आहे.

अविनाश धनवे हा गुन्हेगार असल्याचे माहिती मिळत आहे. अविनाश आळंदीतील कोयता गँगचा म्होरक्या होता. गेल्या काही वर्षांपासून त्याची गँग सक्रिय आहे. धनवे याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी त्याने तुरुगांत इतर कैद्यासोबत मारामारी केली होती.

दरम्यान, काही आठवड्यापूर्वी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्यीची घटना घडली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तब्बल २५ दिवस पोलिसांत उपचार सुरु होते. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT