Pune Fraud News:  Saamtv
क्राईम

Pune Fraud News: साताऱ्याच्या कश्मिरा पवारचा प्रताप! PMO मध्ये सल्लागार असल्याचं सांगून ५० लाखांना गंडवलं, पुण्यात गुन्हा

Pune Fraud News: कश्मिरा पवारने अनेक राजकीय नेत्यांची माझी चांगली ओळख आहे त्यांच्याकडून मी तुम्हाला विविध कामाचे शासकीय टेंडर दिसते, असे सांगून अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती आता समोर येत आहे.

ओंकार राजेंद्र कदम

पुणे, ता. १८ जून २०२४

पंतप्रधान कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार आहे असे सांगत पुण्यातील एका व्यक्तीला तब्बल 50 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारच्या कश्मिरा पवार आणि गणेश गायकवाड या दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील सहकारनगर परिसरात राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय नागरिकाला पंतप्रधान कार्यालयातून शासकीय टेंडर देतो असे सांगत कश्मीरा पवार हिने 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कश्मिरा पवार आणि तिचा सहकारी गणेश गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शासनाचे टेंडर तुम्हाला मिळवून देऊ त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे आमिष पीडित व्यक्तीला दाखवण्यात आले. तसेच विश्वास संपादन व्हावा यासाठी सरकारी कार्यालयात भेटून कश्मिरा पवार या तरुणीने फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम तसेच आर टी जी एस द्वारे तिने वेळोवेळी त्यांच्याकडून ५० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, कश्मीरा पवारने याआधीही पंतप्रधान कार्यालयाची सल्लागार असल्याचे सांगून थेट माध्यमांची फसवणूक केली होती. तसेच देशभरातील अनेक राजकीय नेत्यांची माझी चांगली ओळख आहे त्यांच्याकडून मी तुम्हाला विविध कामाचे शासकीय टेंडर दिसते असे सांगून अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती आता समोर येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deccan Queen: पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन! डेक्कन क्वीन झाली ९६ वर्षांची

Maharashtra News Live Update: शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे

कॉकरोच जनता पार्टीचं वादळ दिल्लीत धडकणार; अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून केली मोठी घोषणा

विधान परिषदेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित; पाहा कोणाला कुठून मिळाली संधी

मुलं की मुली? सोशल मीडियाच्या आहारी जास्त कोण जातं? हादरवणारी आकडेवारी

SCROLL FOR NEXT