Pune Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime: पुणे हादरले! पोलिस पाटलाची हत्या, रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करत संपवलं

Pune Crime News: पुणे जिल्ह्यात पोलिस पाटलाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी भोर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Manasvi Choudhary

पुणे जिल्ह्यातल्या भोरमध्ये पोलिस पाटलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. हल्लेखोराला तात्काळ अटक करून त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या घोरेपडळ-सांगवी बुद्रुक येथे पोलिस पाटील अशोक साधू येनपुरे यांची हत्या करण्यात आली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, अशोक साधू येनपुरे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी येऊन हल्ला केला. हा हल्ला नेमका कुठल्या कारणावरून झाला हे समजू शकलेले नाही. ही संपूर्ण घटना जमिनीच्या वादातून घडल्याचा संशय सुद्धा वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास राजगड पोलिस करत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.

एकमेकांकडे पाहण्यावरून हाणामारी -

पुण्यातील कात्रज-गुजरवाडी परिसरातील दत्तनगर येथे हाणामारीची भयंकर घटना घडली. फक्त एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोन गटांतील तरुणांमध्ये वाद झाला. सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर या वादाला हिंसक रुप आले. दोन्ही गटांच्या तरुणांनी एकमेकांना लाथाबुक्क्या मारहाण आणि विटांनी हल्ला केला. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसान झाले. कात्रज पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचा दबदबा! ११ जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Student Scholarship: आता 124 नवीन अभ्यासक्रमांसाठीही शिष्यवृत्ती अन् निर्वाह भत्ता योजना लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Low BP Symptoms: अचानक BP Low झाला तर काय करावं? त्वरीत कोणते उपाय करावेत?

Maharashtra News Live Update: ठाणे मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; ११ कोटींच्या कोकेन आणि एमडीसह तीन परदेशी नागरिकांना अटक

थोडसं डोकं चालवा आणि मांजरींमध्ये लपलेलं उंदीर शोधून दाखवा, वेळ आहे फक्त १० सेकंद

SCROLL FOR NEXT