Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime: साडेतीन वर्षानंतर महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले, आरोपी गजाआड; धक्कादायक कारण समोर

Crime News: पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या खुनाचा छडा लावण्यास पर्वती पोलिसांना अखेर यश आले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. २३ डिसेंबर २०२३

Pune Crime News:

पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या खुनाचा छडा लावण्यास पर्वती पोलिसांना अखेर यश आले आहे. २०२० मध्ये आर्थिक वादातून महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे प्रकरण?

१७ ऑगस्ट २०२० रोजी पर्वती टेकडीवरून (Pune) तळजाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. याबाबत पर्वती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मात्र महिलेची ओळख पटली नसल्याने तपासात अडचणी येत होत्या.

मृत महिलेच्या हातावर सुरेखा असे नाव गोंदलेले होते. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी ऑगस्ट २०२० मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेतली. यामध्ये रोहन चव्हाण याने खेड शिवापूर पोलिस चौकीत त्याची आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविल्याचे समोर आले.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात आर्थिक वादातून या महिलेचा खून झाल्याची माहिती समोर आली. सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६, रा. खेड शिवापूर, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सागर दादाहरी साठे (वय २६, रा. सुतारदरा, कोथरूड, मूळ रा. पाटील इस्टेट) याला साडेतीन वर्षानंतर अटक केली आहे. पर्वती पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्याच्या साक्रीत काँग्रेसला खिंडार

Narak Chaturdashi Marathi Wishes: दिवाळी पहाट...नरक चतुर्दशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना आणि मित्रमंडळींना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Navi Mumbai Tourism: फिरण्यासाठी हिल स्टेशन शोधताय? नवी मुंबईपासून ५८ किमीवर वसलंय असं एक ठिकाण, पाहून भुरळ पडेल

ढिशूम -ढिशूम! मेट्रोमध्ये २ लोकांमध्ये तुफान हाणामारी, कुणी नाक फोडलं, कुणी केस ओढले..VIDEO व्हायरल

Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेत करिअर करायचंय? मग 'हे' १० फुलफॉर्म जाणून घ्या

SCROLL FOR NEXT