Shubhada Kodare Murder case  Saam Tv
क्राईम

Pune Crime News: पुण्यातील शुभदा कोदारेची हत्या का झाली? तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Shubhada Kodare Murder case : शुभदा कोदारे खून प्रकरणी नवी माहिती समोर आलीय. आरोपी कृष्णाचा विश्वासघात केल्याने त्याने शुभदाला अद्दल घडवण्यासाठी तिच्यावर चॉपरने हल्ला केला.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारेच्या हत्येने पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शुभदाची हत्या तिच्याच कंपनीतील सहकाऱ्याने केल्याची बाब समोर आल्यानंतर आता हत्येमागील कारण समोर आलंय. शुभदाची हत्या करणाऱ्या सहकाऱ्याचं नाव कृष्णा कनोजा आहे, याने शुभदाला अद्दल घडवण्यासाठी तिच्यावर चॉपरने हल्ला केल्याचं सांगितलं जातं आहे. कृष्णा शुभदाला कशाबाबत अद्दल घडवत होता, त्याच्या मनात कसला राग होता ?

पुण्यातील एका आयटी कंपनीच्या पार्किगमध्ये एका महिला कर्मचाऱ्याची हत्या झाल्या घटना मंगळवारी घडली होती. सहकाऱ्यानेच पार्किंगमध्ये चॉपरने हल्ला करत महिला कर्मचारी शुभदा कोदारेचा जीव घेतला. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक केली. दरम्यान शुभदाच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलिसांनी मारेकरी कृष्णाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीतून हत्येची धक्कादायक कारण समोर आलंय.

हत्येमागील कारण काय?

शुभदाने कृष्णाचा विश्वासघात केला होता. त्यामुळे तिला अद्दल घडवायची होती, पण तिला जीवे ठार मारायचं नव्हतं, अशी माहिती कृष्णाने पोलिसांना दिलीय. वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून शुभदाने कृष्णाचा विश्वासघात केला होता. कृष्णाला शुभदाला मारायचे नव्हते पण अद्दल घडवायची होती. विश्वासघाताची आग मनात ठेवत कृष्णाने शुभदावर हल्ला केला.

वडिलांच्या नावाने घेतले पैसे

वडील आजारी आहेत, असं सांगत शुभदाने वेळोवेळी कृष्णाकडून पैसे मागितले होते. मात्र जेव्हा तिच्या वडिलांना कुठला ही आजार नसल्याचे लक्षात आल्यावर कृष्णाने तिला अद्दल घडवायचे ठरवले. मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीमध्ये कार्यरत होते. शुभदाने वडील आजरी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, हे सांगून तिने कृष्णाकडून कधी २५ हजार तर कधी ५० हजार असे एकूण ४ लाख रुपये उकाळले. एवढ्यावर न थांबता शुभदा आणखी पैसे कृष्णाला मागू लागल्याने त्याचा संशय बळावला.

कृष्णाने गाठलं शुभदाचं गाव

कृष्णाने थेट शुभादाचे मूळ गाव कराड गाठले. तिच्या घरी जाताच कृष्णाच्या पायाखालची वाळू सरकली. ज्या आजारी वडिलांसाठी शुभदाने त्याच्याकडून पैसे घेतले होते ते अगदी ठणठणीत होते. कृष्णाने त्यांना आजाराविषीय विचारले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते आजारी नाही आणि त्यांच्यावर कुठली ही शस्त्रक्रिया केली गेली नाही आणि होणार नाही. सत्य समोर आल्यावर कृष्णाने शुभदाकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. यातून त्यांचे अनेकवेळा वादावादी सुद्धा झाली. त्यानंतर कृष्णाने तिला अद्दल घडवण्याचं ठरवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT