Pune News Saam Tv
क्राईम

Pune News: 'आम्ही वस्तीतील भाई' म्हणत तरुणांकडून परिसरात दहशत; दगड, विटांनी वाहनांची केली तोडफोड, CCTV समोर

Vandalism Of Vehicles By Youths: पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. पुन्हा रामटेकडी हडपसर तरुणांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यामध्ये आम्ही या वस्तीतले भाई आहोत, असं म्हणत तरुणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परिसरात दहशत निर्माण करत अनेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. हातात दगड, विटा, पेव्हर ब्लॉक करत वाहनांचे नुकसान केल्याचं समोर आलं आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कपिल तांदळे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली (Crime News) आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, १० जून रोजी कपिल तांदळे हे त्यांची ऑटो रिक्षाचे शिफ्ट बंद करून राहत्या घरी येत होते. तेव्हा कपिल तांदळे रामटेकडी हडपसर येथे आले असता त्यांच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी त्यांना अडवलं. त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोख रक्कम त्यांनी जबरदस्तीने काढून (Pune Crime News) घेतली.

यावेळी तक्रारदार कपिल तांदळे यांनी प्रतिकार केला. तेव्हा रागाच्या भरात या तरूणांनी त्यांच्या तोंडावर दगड मारून त्यांना जखमी केलं. कपिल तांदळे आरोपींना तेथून पोलीस स्टेशनला जातो, असे ( Vandalism Of Vehicles) म्हणाले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. त्या भागात असलेल्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांवर दगड, विटा मारून तोडफोड करून मोठं नुकसान केलं आहे.

यावरच न थांबता आरोपींनी परिसरामध्ये दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांनी 'आम्ही या वस्तीतले भाई आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, कोण मध्ये आले तर त्यांची विकेट पाडू, एक एकाला जीवे मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी (Wanwadi Police Station Area) आता या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीचं सत्र संपायचं नाव घेत नाहीये, रोज नवीन नवीन घटना समोर येत आहे. नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT