Pune Crime Saamtv
क्राईम

Pune Crime: सिद्धू मुसेवाला हत्येतील शॉर्पशुटर संतोष जाधवच्या नावाने व्यावसायिकाला धमकी; पुण्यात खळबळ

Pune Latest News: राजेश्वर तापकिर यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, प्रतिनिधी

Pune Crime News:

पुणे शहरातून एक धक्कादायक समोर आली आहे. कुख्यात डॉन लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार आणि सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील शॉर्पशुटर संतोष जाधवच्या नावाने एका व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. राजेश्वर तापकिर असे या व्यावसायिकाचे नाव असून याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यावसायिक राजेश्वर तापकिर हे पुण्यातील कोथरुड (Kothrud Area) परिसरात राहायला आहेत. त्यांना ३ तारखेला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खंडणी आणि जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आला.

"मी संतोष जाधव बोलतोय सिद्धू मुसेवाला (Siddu Moosewala) कांड ऐकलाय ना? तुला मारण्यासाठी पंधरा लाखाची सुपारी मला मिळाली आहे. तुला जीव प्यारा असेल तर मला पैसे पाठव...' अशी धमकी कॉल करणाऱ्याने दिली. या धमकीनंतर राजेश्वर तापकिर यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, कुख्यात गुंड संतोष जाधव हा पुण्याजवळील मंचरचा रहिवासी आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर संतोष जाधव हे नाव चर्चेत आले. सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणी त्याला  गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तसेच या संतोष जाधवने याआधी बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही धमकी दिली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT