Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या; पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील खळबळजनक घटना

Crime News: हाणामारीत राहुल आणि सय्यद दोघांनीही राजेशवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात राजेश गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर राजेशच्या एका मित्राने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Ruchika Jadhav

Pune Crime:

पुणे शहरातील उच्चभ्रू असलेल्या बालेवाडी परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पुरावा नष्ट व्हावा यासाठी भावाने कार देखील नदीत फेकून दिली. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सुरूआहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजेश असं मृत तरुणाचं नाव आहे. १९ डिसेंबर रोजी आरोपी राहुल आणि सय्यद दोघेही राजेशला भेटले होते. यावेळी या तिघांमध्ये बहिणीवरून वाद झाला. काही वेळाने त्यांची बाचाबाची होऊन हाणामारीला सुरूवात झाली. या हाणामारीत राहुल आणि सय्यद दोघांनीही राजेशवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात राजेश गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हत्येनंतर राजेशच्या एका मित्राने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांची कार देखील नदीत फेकून दिली होती. तसेत तेथून पळ काढला होता. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता आरोपींचा शोध घेतला असून दोघांनाही अटक केली आहे.

बाप लेकाने केलेल्या मारहाणीत १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

बिहारच्या पटनामध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडलीये. शेतातील हरभऱ्याच्या भाजीची पाने तोडल्याच्या रागातून एका १४ वर्षीय मुलीला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत; दीड तास PM मोदींसोबत बैठक; काय झाली चर्चा?

Maharashtra Live News Update: २८ ऑक्टोबरपर्यंत प्रशांत बनकरला पोलीस कोठडी

Rohit Sharma:निवृत्तीच्या चर्चेदरम्यान रोहितचं वादळ; ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं, झळकावलं ३३ वं शतक

वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT