Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: पुणे पुन्हा हादरलं! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घराला कुलूप लावून गेला पळून

Son Killed Mother: धक्कादायक घटनेत ५५ वर्षीय आईचा मुलाने निर्घुन पद्धतीने खून केला आहे. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्याने घरातून पळ काढला असून तो फरार आहे.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune Crime:

शरद मोहळ हत्येनंतर पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात. अशात पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत ५५ वर्षीय आईचा मुलाने निर्घुन पद्धतीने खून केला आहे. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्याने घरातून पळ काढला असून तो फरार आहे.

गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पहावा लागेल याचा तिने विचारही केला नसेल. मुलाने आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली. कुणाला संशय येऊनये म्हणून घराला कुलूप लावून त्याने तेथून पळ काढला. खडकी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.

जखमी सराफ व्यावसायिक आकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक

काल पुण्यामध्ये आत्महत्येची घटना समोर आली होती. पुण्यातील औंधमध्ये आर्थिक वादातून रिक्षा चालकाने सराफ व्यावसायिकावर गोळ्या झाडल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली असून जखमी आकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT