Sharad Mohol Saam tv
क्राईम

Sharad Mohol Case: शरद मोहोळ खून प्रकरणात अभिजित मानकरला अटक, पोलिसांनी शोधल्या १८ हजार ऑडिओ क्लिप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sharad Mohol Death Case

शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच पोलीस चौकशीत आतापर्यंतची मोठी माहिती समोर (Sharad Mohol Case Update) आलीय. शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला मंगळवारी पोलिसांनी अटक (Abhijit Mankar arrested) केलीय.  (Latest Marathi News)

सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद

शरद मोहोळ खून प्रकरणी पोलिसांच्या हाती १८ हजार ऑडिओ क्लिप लागल्या आहेत. या सर्व ऑडिओ क्लिप आरोपींच्या मोबाईलमधून सापडल्या आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ हजार ८२७ ऑडिओ क्लिपपैकी (Sharad Mohol Case audio clips) १० हजार ५०० ऑडिओ क्लिप तपासल्या आहेत. त्यामध्ये सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिजित मानकरला अटक

तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं पोलिसांनी त्याला अटक केलीय. कोथरुड परिसरात ५ जानेवारी रोजी शरद मोहोळचा साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे देखील पोलिसांच्या (Sharad Mohol Case Abhijit Mankar arrested) ताब्यात आहे.

शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आलीय. यानंतर आता याप्रकरणातील अभिजीत मानकर, गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. शेलार आणि मारणे यांनी मोहोळच्या खूनापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं होतं. मारणे याला अटक झाल्यानं तपास आणखी वेगाने होत आहे.

शरद मोहोळवर गोळीबार

शरद मोहोळची त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या (Sharad Mohol Death) झाली होती. मोहोळच्या अंगावर तीन ते चार जणांनी गोळीबार केला. त्यानंतर शरद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर शरदच्या दोन साथीदारांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर शरदवर गोळीबार करून पसार झाले होते. या गोळीबारानंतर गल्लीत एकच कल्लोळ माजला होता. या घटनेनं पुणे हादरलं होतं.

शरद मोहोळच्या हत्येमुळं मुळशी पॅटर्नची पुन्हा एकदा पुनरावृत्ती पुण्यात झालेली पाहायला (Pune Crime News) मिळाली. शरद मोहोळवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT