Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News : पोलीसांची धाड, तो जीव मुठीत घेऊन पळाला; इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पाय घसरला अन् मृत्यू

Fell from the 5th floor of the building : पोलीस कारवाई नको म्हणून तो देखील पळू लागला. पळताना तो थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पोहचला. तेथून त्याचा पाय घसरून तो थेट खाली पडला. यातच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Ruchika Jadhav

सागर आव्हाड

पुण्यामध्ये एका तरुणाचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. पोलीस कारवाईच्या धास्तीने तरुण पळत होता. यावेळी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चरडवस्ती सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार तेथे पत्याचा कल्ब सुरु होता. पोलीसांच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी तेथे धाड टाकली.

पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले असताना सर्वजण पळू लागले. पोलिसांनी काहींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. अशात विश्वनाथ बिरेदारल देखील यामध्ये होता. पोलीस कारवाई नको म्हणून तो देखील पळू लागला. पळताना तो थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पोहचला. तेथून त्याचा पाय घसरून तो थेट खाली पडला. यातच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

बैलगाडा धडकल्यानं जखमी होऊन मृत्यू

पुण्याच्या भोरमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये देखील काल एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला बैलगाडा धडकल्यानं जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय.

विष्णू गेनबा भोमे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. बैलगाड्याची धडक बसल्याने भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT