Pune Crime News: Saam TV
क्राईम

Pune Crime News: पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस... किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला; ३ अटकेत

Pune Crime News: एकाने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादी गुप्ता यांच्यावर वार केले. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. ९ मे २०२४

पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात खून, मारामाऱ्या, तोडफोडीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार शहरातील कोंढवा परिसरातून समोर आला असून किरकोळ वादातून एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, किरकोळ वादातून पानटपरी चालकावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी धर्मेंद्र गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र गुप्ता हे त्यांच्या पानाच्या दुकानात बसले होते. अचानक ३ अनोळखी व्यक्तींनी धर्मेंद्र यांच्या दुकानाजवळ येऊन त्यांच्या टपरीवरील सामान खाली फेकून दिले. तसेच त्यातील एकाने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादी गुप्ता यांच्यावर वार केले. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार..

दरम्यान, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार लोणीकंद परिसरात सात मार्च ते चार एप्रिल दरम्यान घडला. अभि कांबळे याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT