Pune Latest News:  Saamtv
क्राईम

Pune Crime: हॉटेल बुकिंगची माहिती घेत जोडप्याला धमकी अन् ब्लॅकमेलिंग, पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन; पुण्यात खळबळ

Pune Latest News: या प्रकरणी एका तरुणाने कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्यानंतर धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. ४ ऑगस्ट २०२४

हॉटेलमध्ये राहत असलेल्या जोडप्याला पोलीस कर्मचाऱ्यानेच ब्लॅकमेल केल्याचा, धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संदिप वसंत शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यात हॉटेलमध्ये राहणाऱ्या जोडप्याला पोलीस कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संदिप वसंत शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणाने कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्यानंतर धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, हा सगळा प्रकार १९ जुलैपासून घडला. पुण्यातील उच्चभ्रू भाग म्हणून असलेल्या कोरेगाव पार्क लेन नंबर 5 मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये एक जोडपे राहण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये रूम बुकिंगसाठी त्यांनी काही कागदपत्रे दिली होती. ही कागदपत्रे संदिप शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याने हॉटेल मॅनेजरकडून घेतली.

त्यानंतर त्याने संबंधित व्यक्तीस फोन आणि एसएमएस करून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या ब्लॅकमेलिंगनंतर पिडीत तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संदिप शिंदे याचे निलंबन केले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT