Pune Latest News Saamtv
क्राईम

Pune Crime News: फेसबुकवर ओळख, निर्जनस्थळी बोलावत तरुणाला लुटले; जबरी चोरी करणारी टोळी गजाआड

Pune Latest News: १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी तपास करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १४ फेब्रुवारी २०२४

Pune Crime News:

तरुणीशी ओळख करुन देण्याचे आमिष दाखवून तरुणाला निर्जनस्थळी बोलावत लूटमार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली होती. १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी तपास करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणाला फेसबुकवर ओळख करून सेक्सकरिता मुलगी देतो, असे सांगून विश्रांतवाडी येथे कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागे खदाणीजवळ मोकळ्या जागेत नेले. तेथे त्यास दमदाटी करून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.

तसेच फोनपेवरून एकूण ४३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा मोबाईल घेऊन ते पळून गेले होते. या घटनेनंतर तरुणाने पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तपास करत या जबरी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमन अजीज शेख (वय 22 वर्षे, रा. वडगाव शेरी, पुणे), मजरजुबेर खान (वय 24 वर्षे, रा. येरवडा, पुणे), दीपक शांताराम कांबळे (वय 23 वर्ष, रा. जाधवनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आज त्यांची येरवडा कारगृहात रवानगी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT