Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: पुण्यात रक्तरंजित थरार, भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; भयानक VIDEO

Pune Crime Viral CCTV Footage: मित्राच्या हत्येचा राग मनात असल्याने दोघांनी सागरवर कोयत्याने निर्घृण पद्धतीने वार केले आहेत. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेचा CCTV व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे, पुणे

Pune Crime Updates: पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज सकाळी सिंहगड रस्त्यावर काळजात धस्स करणारी एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. सदर घटनेचा थरार समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आला आहे. सागर चव्हाण असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सागर सकाळी त्याच्या घरी असताना त्याला एका मित्राचा फोन आला. मित्राने त्याला बाहेर भेटण्यासाठी बोलावून घेतले. सागर तेथे पोहचताच दोन जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला.

स्वत:ला वाचवण्यासाठी सागर जीवाच्या आकांताने ओरडत होता. मात्र तरी देखील दोघांनीही त्याच्यावर वार करणे थांबवले नाही. दोघांनी मिळून सागरवर निर्घृणपणे हल्ला केला आहे. सध्या सागर या हल्ल्यात गंभीर जखमी आहे.

मित्राच्या हत्येचा घेतला बदला

मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघीतल्यावरून भांडण झाले होते. त्याचवेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. श्रीनिवास वतसलवार असे त्या मृत तरुणाचे नाव होते. ज्या तरुणांनी श्रीनिवासवर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण एक होता.

सागरला संपवण्याचा मास्टर प्लान

सागर चव्हाण याला मारण्यासाठी आरोपींनी एक अनोखा मास्टर प्लान तयार केला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने अकाउंट तयार केलं होतं. या अकाउंटवरून सागरला अनेक मेसेज देखील करण्यात आले होते. आपल्याशी रोज बोलत असल्यामुळे सागर या अकाउंटमधील मुलीच्या प्रेमात पडला होता.

मात्र हे अकाउंट आरोपी चालवत असल्याची कुठलीही कुणकुण त्याला लागली नव्हती. महिनाभर चॅटींग केल्यानंतर आज आपण भेटू असं सागरला सांगण्यात आलं होतं. आज सकाळी सागर मैत्रिणीला भेटायचं म्हणून किरकटवाडील येथे पोहचला. त्यावेळी त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT