Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News : कोयत्याने वार, २ तरुण रक्तबंबाळ! तरुणीसाठी पुण्यात भरदिवसा थरारक घटना

Crime News : आता देखील अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिकसंबंधाच्या संशावरून दोन व्यक्तींनी एकमेकांवर थेट कोयत्याने वार केलेत.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. डोक्यात राग ठेवून व्यक्ती एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. अशात आता देखील अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिकसंबंधाच्या संशावरून दोन व्यक्तींनी एकमेकांवर थेट कोयत्याने वार केलेत.

पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात एका तरुणाने दुसऱ्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केलंय. झालेल्या झटापटीत दोघेही रक्तबंबाळ झालेत. पुण्यात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याने जाताना कधी काय होईल आणि काय नाही याचा काहीच नेम नाही, अशा घटनांमुळे सामान्य नागरिक भीती व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून ही माहिती मिळाली आहे.

मिरेकर आणि धोत्रे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. मिरेकरला धोत्रेवर राग होता आणि त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने मिरेकरसा रस्त्यात गाठलं आणि त्यावर कोयत्याने वार केले.त्यानंतर धोत्रेने सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलवून मिरेकरवर हल्ला चढवला. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांकडून तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT