Pune Crime  Saam Tv
क्राईम

Pune Crime: क्षुल्लक वादातून आधी बायकोची हत्या, नंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवलं; पुण्यात खळबळ

Pune Police: पुण्यामध्ये नवऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेत आयुष्य संपवलं. ही घटना दौंडमध्ये घडली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे दोन मुलं पोरकी झाली.

Priya More

पुण्यामध्ये नवऱ्याने बायकोची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील रावणगावमध्ये ही घटना घडली. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून नवऱ्याने बायकोचा खून करून स्वतः आत्महत्या केली. दौंड तालुक्यातील रावणगावमधील रानमळा वस्ती परिसरात ही थरकाप उडवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. नवऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर काही वेळातच त्याने राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली.

या दुहेरी मृत्यूनं गावात मोठी खळबळ उडाली आहे. जयश्री अशोक गावडे (वय 45 वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर बायकोची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव अशोक मारुती गावडे (वय 50 वर्षे) असे आहे. दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मुलांना मोठा धक्का बसला आहे.

जयश्री आणि अशोक यांच्यामध्ये सतत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे रात्री त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडेने जयश्री यांचा गळा दाबला आणि त्यांना जागीच संपवलं केला. त्यानंतर काही वेळातच संतापातून अशोक यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचाअधिक तपास दौंड पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी, खासदार प्रतिभा धानोरकरांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन

Snake Bite : नुकसानीचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Pakistan: पाकिस्तानला पुन्हा हादरा! पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू

Hair Wash Routine: आठवड्यातून किती वेळा धुवावेत केस? जाणून घ्या पद्धत

Hidden Mumbai Places: गर्दीपासून दूर कपल्ससाठी परफेक्ट Top 7 स्पॉट्स; विकेंडला जोडीदार होईल खुश

SCROLL FOR NEXT