Pune Crime crime News
क्राईम

Pune Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची २२ लाखांची फसवणूक; ठगणाऱ्या मुलीविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime : एका तरुणाची सोशल मीडियावर या तरुणीसोबत मैत्री झाली. त्यानंतर या तरुणीने तरुणाची फसवणूक केली.

Bharat Jadhav

Pune Crime :

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची घटना वाढू लागल्या आहेत. पुण्यातील लोणीकंद परिसरात एका मुलाची फसवणूक झालीय. लग्नाचं आमिष दाखवून एक तरुणीने तरुणाला २२ लाख रुपयांचा गंडा घातलाय. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest News)

याबाबत वाघोली येथील एका ३० वर्षीय तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. पीडित मुलाच्या तक्रारीनुसार, तरुणीसह जय भगवान रोकडे (दोघे रा. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीनंतर पोलिसांनी जय रोकडेला अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील एका तरुणाची सोशल मीडियावर या तरुणीसोबत मैत्री झाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर या तरुणीने तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून घरगुती आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे पैसे मागितले. हे पैसे परत करेन असं आश्वासन तरुणीनं दिलं. तरुणीवर विश्वास ठेवत तरुणाने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने या मुलीला २२ लाख रुपये दिले. त्यानंतर तरुणाला आर्थिक अडचण आल्यानंतर तरुणाने तिच्याकडे पैसे मागितले. त्यानंतर तिने तरुणाला उडवाउडवीचे उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रार दिली.

मुंबईतही अशीच घटना घडली होती. येथे एका ७५ वर्षीय महिलेची फसवणूक झाली होती. महिलेला आमिष दाखवून तिला तब्बल साडेबारा लाख रुपयांचा गंडा दोन जणांनी घातला होता. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोघांना अटक केली होती. नोव्हेंबर महिन्यात ख्रिस पॉल नावाच्या इसमाने व्हाट्सअपवर महिलेशी संपर्क केला आणि आपण जर्मन नागरिक असल्याचा बनाव केला.

त्यानंतर त्याने महिलेला लग्नाची स्वप्न दाखवली आणि विश्वास संपादन केला. त्यानंतर या तोतया पॉलने महिलेसाठी गिफ्ट कार्ड पाठवण्याचा बनाव करत हे गिफ्ट कार्ड कस्टमर क्लिअरन्समध्ये अडकल्याचा दावा करत महिलेकडून पैसे उकाळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT