Pune Crime: 
क्राईम

Pune Crime: स्वातंत्र्य दिनालाच अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना!

Pune Crime: पुण्यातील भवानीपेठेतील शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

बदलापूरमधील घटना ताजी असतानाच पुण्यातील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील भवानी पेठेत हे एक नामांकित शाळा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी तरुण हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने तिचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला.

यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत पळ काढला. घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

Unique Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे 5 युनिक डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर उठून दिसतील

Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Love at first sight: या ३ राशींच्या व्यक्तींना पहिल्याच नजरेत होतं प्रेम

SCROLL FOR NEXT