Pune Crime News: Saam TV
क्राईम

Pune Fraud: माय-लेकाचा प्रताप! पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Fraud News: कंपनीत गुंतवलेली रक्कम दामदुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून 31 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यामधून समोर आला आहे

Gangappa Pujari

नितीन पाटणकर| पुणे, ता. १३ जुलै २०२४

कंपनीत गुंतवलेली रक्कम दामदुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून 31 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. शहरातील कल्याणीनगर भागात जून 2022 मध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनीआई आणि मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीत गुंतवलेली रक्कम दामदुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून 31 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आई आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रितेश बाफना याने सर्वप्रथम फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला पैसे दामदुप्पट करुन देतो असे सांगितले. फिर्यादी यांनी प्रितेश याच्यावर विश्वास ठेवून अमित एन्टप्रायजेस नावाच्या बँक खात्यात तसेच आरोपीची आई मंगला बाफना यांच्या बँक खात्यात 30 लाख 75 हजार रुपये जमा केले.

तर एक लाख रुपये रोख असे एकूण 31 लाख 75 हजार रुपये प्रितेश याला दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी पैसे दामदुप्पट करुन न देता तसेच घेतलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांता धाव घेतली. या प्रकरणी प्रितेश प्रकाश बाफना, मंगला प्रकाश बाफना (दोघे रा. सार्थक लेन, साई सत्यम पार्क, वाघोली) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT