Yerwada Jail News Saamtv
क्राईम

Yerwada Jail News: धक्कादायक! येरवडा कारागृहातील कैद्यांचा पोलीस हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर

Pune Crime News: कैद्यांनी पोलीस हवालदारास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नानासाहेब मारणे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी चार कैद्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. ११ मे २०२४

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांनी पोलीस हवालदारास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नानासाहेब मारणे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येरवडा कारागृहात कैद्यांकडून पोलीस हवालदाराला त्याच्याच काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नानासाहेब मारणे असे या हवालदाराचे नाव असून या मारहाणीत त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. याप्रकरणी चार कैद्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहातील सी.जे. विभागात दगडी भिंत पाडून नवीन बांधकाम चालू करण्यात आले आहे. सकाळी नानासाहेब मारणे हे गस्तीवर असताना त्यांनी भिंतीचा दगड लागल्यास इजा होईल, असे कैद्यांना सांगितले. यावरुनच झालेल्या वादानंतर कैद्यांनी मारणे यांच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांना लाथाबुक्क्यांनी डोक्यात, हातावर मारहाण केली.

या मारहाणीत मारणे यांना गंभीर इजा झाली असून त्यांच्या मनगटाचे हाड मोडले आहे. या धक्कादायक प्रकारनंतर मारणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अपूर्व खंडागळे, सूरज अडागळे, आनंद उपाख्य सोनू धड आणि नीरज ढवळे या कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मनसेला मोठा धक्का! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ, लवकरच शिंदेसेनेत करणार प्रवेश

High blood sugar: शरीरात ही ५ लक्षणं अचानक दिसली तर समजा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतंय

महिलांनो सावधान! अति रक्तस्त्राव असू शकते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण; करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update: बीडच्या केज तालुक्यात रास्ता रोको आंदोलन, रुग्णवाहिकेची तोडफोड

Pune Crime: बिल्डर अग्रवालच्या मुलाला होणाऱ्या बायकोनं किल्ल्यावरून ढकललं, पण बॉयफ्रेंडमुळं प्लान फसला, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT