Pune Narcotics Saam Tv
क्राईम

Pune Crime : पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात मोठी; मास्टरमाईंडचं नाव आलं समोर, दिल्लीत पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Narcotics : पुणे पोलिसांनी दिल्लीत छापेमारी करत गेल्या २ दिवसांमध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९७० किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ९०० किलो एमडी ड्रग्सची किंमत २००० कोटी रुपये आहे. पुणे पोलिसांनी राजधानी दिल्लीत केलेल्या कारवाईचे फोटो समोर आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय बडवे, पुणे)

Pune Narcotics Case :

पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात सगळ्यात मोठी अपडेट समोर आलीय. ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड कोण असल्याचं समोर आलंय. या रॅकेटचा मास्टरमाईंड हा संदीप उर्फ सनी धूनिया असून तो मूळचा पाटणाचा आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध टीम सनी याचा शोध घेत आहेत. सनीचे कुटुंब लंडनमध्ये वास्तव्यास आहे. २०१६ मधील कुरकुंभ येथे मारलेल्या छाप्यात सनी याला पकडण्यात आले होते.(Latest News)

त्यावेळी ३५० किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता. याच ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली. दरम्यान, पुणे पोलिसांनी दिल्लीत छापेमारी करत गेल्या २ दिवसांमध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९७० किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ९०० किलो एमडी ड्रग्सची किंमत २००० कोटी रुपये आहे.

पुणे पोलिसांनी राजधानी दिल्लीत केलेल्या कारवाईचे फोटो समोर आले आहेत. दिल्लीतून पुणे पोलिसांनी केले ३ आरोपींना अटक केलीय. दिल्लीत अटक केलेल्या आरोपींना आज रात्रीच पोलीस पुण्यात घेऊन येणार आहेत. पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात दररोज नवीन धागेदोरे मिळू लागलेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत ३०० कोटींपेक्षा अधिक किमतीचा ड्रग्जसाठा जप्त केलाय. या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याच्या दृष्टीनं गुन्हे शाखेनं याप्रकरणात आठ आरोपींना अटक केलीय.

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये त्यांच्याकडून आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागलीय. आरोपींच्या मोबाईल डेटा तपासल्यानंतर पोलिसांना गुन्हेगारांची टोपणनावं समजली आहेत. या नावाचा वापर करत पेडलर ड्रग्जची तस्करी करत होते. ड्रग्स रॅकेट मध्ये "लंबा बाल" आणि "मुंबई का बंदर" या टोपण नावांचा वापर होत होता. याप्रकरणी गुन्हेगार वैभव माने याला केसांची शेंडी होती अन् त्यामुळे त्याला "लंबा बाल" म्हणून ओळखले जात होते तर मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला "मुंबई का बंदर" म्हणून हाक मारली जायची.

मुळात हे प्रकरण पुण्यातील सोमवार पेठेत जरी सुरू असले तरी सुद्धा याची व्याप्ती साता समुद्रापार पोहचली आहे. कारण पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील निर्मित केलेलं ड्रग्स चं सेवन लंडन मध्ये केलं जात असल्याची धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आलीय. संशय येऊ नये म्हणून ड्रग्स पेडलर एम डी ड्रग्सची अत्यंत शिताफीने "रेडी टू ईट" म्हणजेच तयार खाद्य पदार्थांच्या पाकिटातून तस्करी करत असे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT