Avhalwadi Warule couple death case Saam Tv News
क्राईम

Pune Crime : अंगावर मारल्याचे घाव, रक्ताने माखलेली ओढणी, पुण्यात नवरा-बायकोचा मृत्यू; प्रकरणाचं गूढ उलगडलं

Pune Husband & Wife Death Case : पोलिसांनी दोघांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, उज्वला यांचा शवविच्छेदन अहवालात अंगावरील मारलेले घाव, लोखंडी हातोडा, चाकू आणि रक्ताने माखलेली ओढणी घटनास्थळी आढळून आले होते.

Prashant Patil

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : आव्हाळवाडी येथील वारुळे दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या करून स्वतः हा आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मृत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी राहत्या घरात नागनाथ वारुळे (वय ४२) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी उज्वला (वय ४०) ही बाजूला बेडवर मृत अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी दोघांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, उज्वला यांचा शवविच्छेदन अहवालात अंगावरील मारलेले घाव, लोखंडी हातोडा, चाकू आणि रक्ताने माखलेली ओढणी घटनास्थळी आढळून आले होते. यावरून नागनाथ याने पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झालं. मारहाण करून गळा आवळून त्याने पत्नीची हत्या केली. यानंतर वाघोली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला.

ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा मेसेज आला अन् एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी सुत्रे हालवली अन् आरोपीला बेड्या ठोकल्या. बंडगार्डन पोलिसांनी अरविंद कृष्णा कोकणी (वय २९) याला येरवडा परिसरातून अटक केली आहे. आरोपी हा ससून हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. १२ मे रोजी ससूनमधील एका डॉक्टरच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून "हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवला आहे" असा धमकीचा मेसेज आला. यानंतर बंडगार्डन पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने (बीडीडीएस) हॉस्पिटल परिसराची कसून तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. मेसेजमुळे हॉस्पिटल परिसरात काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपीने ससूनमधील एका महिला रुग्णाचा मोबाईल फोन चोरून त्यावरून धमकीचे मेसेज केल्याचे उघड झाले. पहिला मेसेज एका डॉक्टरला पाठवून त्याने फोन स्विच ऑफ केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन ऑन करून ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकांना दुसरा धमकीचा मेसेज पाठवला आणि फोन पुन्हा बंद केला. पोलिसांनी खबऱ्यांच्या माहितीवरून आरोपीला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT